बी एस एन एल नावाप्रमाणे नेहमीच "भाई साहब नही लगता" अशी म्हणण्याची वेळ चिखलदरा वासियांची आली आहे. चिखलदरा मध्ये गेल्या पंधरा दिवसापासून बी एस एन एल चीं सेवा खंडित असल्याने सर्व शासकीय व ग्रामपंचायत चीं ऑनलाईन कामे ठप्प आहेत.मेळघाट मधील अततीदुर्गम व मागासलेला तालुका म्हणून चिखलदरा संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. कित्येक वर्षानंतर कुठं आता चिखलदरा तालुक्यात बी एस एन एल चीं सेवा ऑप्टिकल फायबर अंडर ग्राउंड करून टाकण्यात आली आहे. त्यामुळे मेळघाट च्या जवळपास ग्रामपंचायती ऑनलाईन जोडण्यात आल्या आहेत. परंतु त्याची सेवा नियमित मिळत नसल्याने सर्व मोबाईल नेटवर्क बंद आहेत. व सर्वच शासकीय कामे ठप्प असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांनी बरेचदा संबधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी कधीच फोन उचलत नाही. या भारतीय दुरसंचर निगम लिमिटेड. चीं सेवा खंडित असल्याने विदर्थ्यांना शालेय कामकाज व जाती दाखला, डोमसिअल उत्पन्न दाखला मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधव शासकीय कामासाठी तालुक्याला जातात परंतु बी. एस.एन. एल.चीं सेवा खंडित असल्याने आल्या पावली परत जावे लागत आहेत.बी एस एन एल चीं सेवा त्वरित सुरु करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अन्याय ग्रस्त नागरिकांनी दिला आहे.
चिखलदऱ्यात बिएसएनएल चीं सेवा पंधरा दिवसापासून खंडित...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
