ढगफुटीत वाहून गेलेल्या रस्ताने खडतर प्रवास करीत आरोग्य यंत्रणेने एका कुपोषित चिमुकलीला वैद्यकीय सेवा उपलब्ध केली.सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत माखला येथिल 19 वर्षिय वनमालाचा विवाह मध्यप्रदेशच्या भैसदेही तालुक्यातील कसाई येथे गतवर्षी झाला. वनमालाचा अडीच महिन्यांपूर्वी प्रसूती झाली. मंगळवारी ती निरजला घेवून माखला येथे आली. गावात येताच अगनवाडी सेविका ज्योती सोमदे आरोग्य सेविका सिंधू सावरकर यांनी चिमुकल्या नीरजाची तपासणी केली आणि तीव्र कुपोषित असल्याची माहिती आरोग्य केंद्रात डॉक्टर महेश कूतकोटी, डॉ. दिपक कुंडेटकर, डॉ. सुषमा इंगोले याना दिली.
घरात ठेवले लपवून
डॉ. दिपक कुंडेटकर, समुपदेशक शिवदास बिसंदरे, चंद्रकला मावस्कर, आरोग्य सहायक काळे, आशा ललिता मावस्कर, कला मानसिंग जावरकर, पोलीस पाटील शिवकली सेलुकर, चालक समीर शेख यांनी बुधवारी दुपारी 12 वाजताच माखला गाठले. वनमालाची सायंकाळपर्यंत मनधरणी केली. परत गुरुवारी सकाळी 8 वाजता ही चमू गेली. तेव्हा दोन्ही मायलेकीना घरात लपवून ठेवण्यात आले आणि शेतात गेल्याचे सांगण्यात आले.
*वाहून गेलेला रस्ता आणि रुग्णवाहिकाची बिकट वाट*
मेळघाटात 22 जुलै रोजी ढगफुटी झाली. या रस्त्यावर दीड किलोमीटर पर्यंत कोसळलेल्या दरडीमुळे जीवघेण्या ठरलेल्या सेमाडोह मार्गाने प्रवासाचा धोका पत्करून आरोग्य यंत्रणा गाव गाठले. धारणी उपजिल्हा रुग्णालयातील बाल संगोपन केंद्रात डॉ. जावरकर उपचार करीत आहेत.
🔷प्रतिक्रिया🔷
अडीच वर्षीय नीरजला धारणी उपजिल्हा रुग्णालयात बाल संगोपन केद्रात दाखल करण्यात आले. तंज्ञ डॉक्टर तिच्या वर लक्ष ठेवून आहेत. रुग्णाच्या जीवीताची थरकाप उडविणाऱ्या रस्ताने आरोग्य यंत्रणेला जावे लागत आहे.
-दीपक कुंडेटकर, वैद्यकीय अधिकारी सेमाडोह
