धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनेचा इशारा...


 विशेष प्रतिनिधी:-

धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेळ्या मेंढ्या व मुलाबाळांसह एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नंदू भाऊ लवंगे व शिव अहिल्या शासन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ गीता ताई सोनोने यांनी दिला आहे धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 23/ 8 /2021 रोजी शेळ्या मेंढ्या व मुलाबाळांसह एक दिवसीय धरणे आंदोलन व निवेदन देण्याचा ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेना व शिव आहिल्या शासन संघटना यांनी बुलढाणा जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वंशपरंपरागत शेळी व मेंढी पालन करणाऱ्या धनगर मेंढपाळ बांधवावर कोरोणा महामारी मुळे संकट आलेले आहे त्यात आणखी भर म्हणून वन विभागाकडून मेंढपाळावर चराई बंदी घालण्याचे प्रकार झाले आहेत त्या अनुषंगाने धनगर समाजाच्या विविध मागण्या सह जिल्हाधिकारी कार्यालयावर 23-8-2021 मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्यातील प्रमुख मागण्या. 

1- वन परिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांची गोळीबार प्रकरणात खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करावे व त्यांच्यावर दहशत पसरवण्याचे गुन्हे दाखल करावे 

2- मेढपाळा ना चराई साठी जागा उपलब्ध करून द्यावे व पासेस उपलब्ध करून द्यावे

 3- देवनाथ गोरे यांच्या वरील खोटे गुन्हे दिनांक 11 /8 /2021 रोजी दाखल झालेले असून सदर प्रकरणात मेंढपाळ आस उगाच गोवण्यात आल्याचे दिसून येते तरी त्यांच्यावरील खोटे गुन्हे त्वरित रद्द करण्यात यावे या व इतर मागण्या सह दिनांक 23/ 8/2021 रोजी जयस्तंभ चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे सदर मागण्यांचे निवेदन आज दिनांक 11/8 /2021 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना देण्यात आले असून सदर निवेदनावर नंदू भाऊ लवंगे  धनश्री काटीकर विनोद सपकाळ शांताराम पिसाळ यांच्या सह्या आहेत.

Previous Post Next Post