मेळघाट मध्ये वनविभागातील वनपालांच्या बदल्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याने संतप्त अन्यायग्रस्त वनपालांनी उच्च न्यायालयात मॅटकडे धाव घेतली आहे. व तेथून या बदल्यावर स्थगिती आणली आहे.ज्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी व्याघ्र प्रकल्पात काम केले आहे त्यांना पुन्हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात या बदली आदेशानुसार पाठविण्यात आले आहे. व ज्यांनी कधीच व्याघ्र प्रकल्पात सेवा दिली नाही, त्यांना पुन्हा शहरी भागातच ठेवण्यात आले.तसेच जे बदलीसाठी पात्र आहेत परंतु अधिकाऱ्यांच्या मार्जितील आहेत,त्यांनाही त्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे.काहींनी सेटिंग करून तर काहींनी राजकीय दबावतंत्राचा वापर करून संपूर्ण सेवा प्रादेशिक मधेच अबाधित ठेवली.22 मे 2017 च्या शासन निर्णयानुसार सर्वप्रथम बदलीपात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करणे गरजेचे होते. व त्यानंतर शहरी भागात कार्यरत अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध करायची होती. यामधून ज्यांनी व्याघ्र प्रकल्पात कधीच सेवा दिली नाही त्यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पात स्थानानंतरित करणे अपेक्षित असताना बदली करताना या बाबीला मूठमाती दिली.या बदली प्रक्रियेमध्ये दोन मुख्य लिपिकासह मुख्यवनसंरक्षक सहभागी असल्याची चर्चा आहे.
वनविभागातील वनपाल बदलीप्रकरण मॅट मधून स्थगिती...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
