जारीदा इंडियन बँक पीक कर्ज माफी योजनेत झालेल्या अनियमिततेबाबत संबंधित अधिकाऱ्यावर होणार कार्यवाही.उपविभागिय अधिकारी वैभव वाघमारे यांचे संकेत.


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

मेळघाटातील अतिदुर्गम भागातील इंडियन बैंक शाखा जारीदा येथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणेमुळे येथील शेतकऱ्यांना पिक कर्ज माफी पासुन वंचित ठेवण्यात आले असल्याचे आरोप जारिदा शाखेत येनाऱ्यां गावातील शेतकऱ्यांनि केला आहे.शेतकऱ्यांचे हे सुधा म्हनने आहे की, आम्ही जेव्हा माफी बाबत विचारले की आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.याबाबत तहसीलदार पासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत परसरातील नागरिकांनी तक्रारी केल्या.नव्याने रुजू झालेले उपविभागीय अधिकारी श्री.वैभव वाघमारे यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहे. इंडियन बँक जारीदा शाखेचे मॅनेजर मोहाडीकर व सहाय्यक योगेंद्र लोकांच्या घरी जाऊन कोऱ्या बुकलेट व स्लिप वर सह्या करून त्यांचे नुतनीकरण करीत आहे. व शेतकऱ्यांच्या सेव्हिंग खात्यातील व घरकुलाच्या पैशातून रक्कम कपात करत असल्याचे सांगितले जात आहे. शेतकरी कर्ज माफी योजनेस पात्र असतांना ते वसुली व नुतनीकरणाचे काम करीत आहे.    सहकारी अधिकारी गडलिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की. बँकेने शेतकऱ्यांची माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजने पासुन वंचित रहावे लागले आहे. बॅंकेचे कर्मचारी कोऱ्या स्लिप वर सही व अंगठा घेत आहे. व फक्त कागदोपत्री शेतकऱ्यांचा भरणा व उचलना दाखवुन शासनाची दिशाभूल करीत आहे. सदर बॅकेत जवळपास २०० कर्जदार कर्ज माफी पासून वंचित असल्याने त्यासाठी सर्वस्वी बँक मॅनेजर जबाबदार असल्याने त्याच्यावर कार्यवाहीची मागणी केली होती त्या अनुशंगाने उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे यांनी त्वरित चौकशी करून कार्यवाही करणार असल्याचे सांगितले आहे.

Previous Post Next Post