चिखली येथील ऑक्सिजन प्लांटला मान्यता.... आ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नांना यश...


 बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.

चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ९० लक्ष रुपये किमतीच्या ऑक्सिजन प्लांटला मान्यता मिळाल्याने आ. श्वेताताई महाले यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले असून ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे अशी माहिती आ. श्वेताताई महाले यांचे सेवालय या जनसंपर्क कार्यालयात देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दिनांक ०२/०८/२०२१ रोजी दिलेल्या पासिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्या अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यावेळी ऑक्सिजन मिळत नसल्याने चिखली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करावी अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी दिनांक २२/०६/२०२१ रोजी पालकमंत्री तथा जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती.चिखली येथे उपजिल्हा रुग्णालयात समर्पित कोविड हेल्थ सेंटरला सुद्धा आ. श्वेताताई महाले यांचे प्रयत्नानेच मान्यता मिळालेली असून उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीची दुरुस्ती करून त्याठिकाणी कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात येणार होते. त्याच ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये याकरिता हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा ऑक्सिजन प्लांटला सुद्धा मान्यता देण्याची मागणी आ. श्वेताताई महाले यांनी त्यावेळी केली होती. त्या अनुषंगाने आ. श्वेताताई महाले यांचे प्रयत्नाने कोविड हेल्थ सेंटर आणि ऑक्सिजन प्लांट या दोन्ही कामांना मान्यता मिळाल्याने चिखली शहराच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून दोनही कामे मैलाचा दगड ठरणार आहे.

दररोज ८० जंबो सिलेंडरची निर्मिती...

चिखली येथे बसविण्यात येणाऱ्या ऑक्सिजन जनरेशन प्लांट हा ४०० LPM क्षमतेचा असून यातून दररोज ८० जंबो सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार असून होणारी ऑक्सिजन निर्मिती ही हवेतून होणार असल्याने किरकोळ खर्चातून दररोज मोठ्या प्रमाणात मोफत प्राणवायू मिळून रुग्णांना दिलासा मिळणार आहे.  

पालकमंत्र्यांचे मानले आभार....

 मा. पालकमंत्री महोदय यांनी आ. श्वेताताईंच्या मागणीच्या अनुषंगाने कोविड हेल्थ सेंटर तसेच ऑक्सिजन प्लांटला मान्यता दिल्याबद्दल आ. श्वेताताई महाले पाटील यांनी पालकमंत्री महोदयांचे आभार मानले आहे. 


Previous Post Next Post