उद्यानविद्या महाविद्यालयातील कृषिदूताची शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कार्यशाळा...


 जळगाव जामोद प्रतिनिधी:--

 जळगांव जामोद येथील स्थानिक स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयातील उद्यान विद्या विभागाच्या विद्यार्थ्यांची दिनांक 30 जुलै रोजी कृषिदूत कार्यशाळा शेतावर संपन्न झाली.कोरोना च्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांचे अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत.           यामुळे स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय येथील शैक्षणिक सत्र सुद्धा  ऑनलाइन पद्धतीने घेतले जात आहे. यामध्ये अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भागातील शेतकरी नेमून त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचे महाविद्यालय द्वारे सांगण्यात आले आहे. तर त्या अंतर्गत खेर्डा बु येथे  उद्यान विद्या विभागाचा विद्यार्थी संकेत जयदेवराव वानखडे द्वारे शेतकऱ्यांची कार्यशाळा सुरेंद्र भोपळे आणि सुधाकरराव देशमुख यांच्या शेतामध्ये घेण्यात आली.यामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक शेती, सेंद्रिय शेती, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर तसेच माती परीक्षणाचे फायदे, बीजप्रक्रिया कशी करावी व त्याचे  फायदे आणि वेगवेगळी प्रात्यक्षिके त्याठिकाणी करून दाखवण्यात आली.या कार्यक्रमासाठी उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य वाय आर गवई , उपप्राचार्य एस एस धर्माळ , जी आर साळी , ए डी सुने , पी एस वानखडे , एन भोपळे, पी पी कुल्लरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous Post Next Post