अकोला,(जिमाका)-
मेळघाट व्याघ्र प्रकल्प व अकोट वन्यजीव विभाग, अकोट अंतर्गत येणाऱ्या नरनाळा परिक्षेत्रामध्ये कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन अटी शर्तीसह पर्यटकांकरीता निसर्ग पर्यटन व जंगल सफारी सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे. शहानुर येथील सफारी गेट मधुन नरनाळा अभयारण्याच्या बफर क्षेत्र व खटकाली गेट मधून सुलई नाला धबधबा पर्यत पर्यटकांना सफारी सुरु असुन पर्यटकांना सफारी गेटवर बुकींग करता येईल, सुलई नाला धबधबा हे चिखलदरा तालुक्यात येत असून चिखलदरा तहसिलदारांचे आदेशानुसार शनिवार व रविवारला पर्यटनाकरीता बंद राहील, पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तीची थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल, पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश देते वेळी पायाने वापरण्यात येणारे सॅनिटायझर किंवा मशीनव्दारे सॅनिटाईझ करण्यात येईल. पर्यटनासाठी येणाऱ्या व्यक्तींना मास्क लावणे आवश्यक राहील. शहानुर येथील ईको हट व ईको टेंट बुकींग ऑफलाईन व ऑनलाईनव्दारे करता येईल. सद्यास्थितीत पावसाळा सुरु असल्याने ज्या दिवशी पाऊस जास्त किंवा सतत सुरु असेल अशा दिवशी पर्यटकांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यटन(सफारी) बंद राहील, अशी माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्प व अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसरंक्षक एस. नवकिशोर रेड्डी दिली आहे.