___ग्रामपंचायत निधी अपहारप्रकरणी जामोद ग्रामपंचायत सदस्यांचे उपोषण सुरूच--


 जळगाव(जामोद)प्रतिनिधी:-

दिनांक १४ आँगष्ट पासुन जळगांव जामोद पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. ग्रामपंचायत जामोद अंतर्गत गेल्या काही महिन्यापासून विविध विकास निधीचा अपहार झाला असून ग्रामपंचायतीने निविदा चुकीच्या पद्धतीने मंजूर केल्या आहेत, ग्रामपंचायत प्रशासन च्या गैरव्यवहाराची वारंवार चौकशी करण्याची मागणी केली आहे. झालेल्या कामाचे देयक थांबवावे, घरकुलासाठी देण्यात आलेल्या भूखंडा च्या खरेदी मध्ये गैरव्यवहार झालेला आहे. ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या कोणत्याही बिलावर जीएसटी क्रमांक नाही. झालेल्या कामाचे चाचणी अहवाल प्राप्त नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिल्यावर सुद्धा ग्रामपंचायतीने संबंधित कंत्राटदारांना देयके अदा केली आहेत.या सर्व विकास निधी ची संबंधितांकडून तात्काळ वसुली करावी, या मागणीसाठी जामोद च्या ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर १४ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.जामोद ग्रामपंचायतीचे उपसरपंच सलाम खा जहांगीरखा, संजय धुर्डे, दीपक घाटे, वसंतराव धुर्डे  ह्या चार सदस्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू करून पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तसेच उपोषण मंडपाला राष्ट्रवादीचे नेते रंगराव देशमुख, शिवसेना सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, जिल्हा उपप्रमुख तुकाराम भाऊ काळपांडे, शिक्षण सभापती रमेश ताडे, वंचित बहुजन आघाडीचे सुनील बोदडे यांच्यासह विविध पक्षातील नेते तसेच कार्यकर्त्यांनी या उपोषण मंडपाला भेट देत आपला पाठिंबा दिला.

Previous Post Next Post