जळगाव जामोद येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिरंगा रॅली व वीर जवानांना श्रद्धांजली वाहून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन साजरा..


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

दिनांक १५ आँगष्ट रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दुर्गा चौक येथील भाजपा कार्यालयामध्ये ७४ वा स्वातंत्र्य  दिवस साजरा करण्यात आला.यावेळी भाजपा शहर अध्यक्ष अभिमन्युजी भगत यांचा हस्ते ध्जारोहण करून राष्ट्रगीत म्हणून मानवंदना देण्यात आली.नंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वात जळगाव शहरांमधून भव्य मोटारसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली.भारत मातेची प्रतिमा फुल हारांनी सजवून गाडीमध्ये ठेवून,पंकज देशमुख यांच्या मुलीला भारत मातेच्या वेशभूषेत तयार करून भारत माता की जय. वंदे मातरम्, स्वातंत्र्य दिन चिरायू होवो अशा नाऱ्यांच्या गजरात जळगाव जामोद शहर दणानुन गेले होते. नारे लावत मोटरसायकल तिरंगा रॅली ही दुर्गा चौक,चौबारा चौक,मानाजी चौक, सिद्धार्थ नगर, जुने भाजी मार्केट, बुलढाणा अर्बन बँक, या मार्गाने परत दुर्गा चौकात येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले तसेच त्यांनी दुर्गा चौकामध्ये शहिदांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी माजी मंत्री भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संजय कुटे साहेब,नगराध्यक्षा सौ.सीमाताई डोबे,अनिताताई जयस्वाल ,महिला मोर्चा शहर अध्यक्ष शिल्पाताई भगत, नगर सेविका सविताताई कपले,उषाताई धनंदर,नलूताई भाकरे ,लताताई तायडे ,आरती पलन ,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख ,तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ ,प्रा.डाबरे सर ,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकरे,शहर अध्यक्ष उमेश येउल,मांगीलाल भंसाली ,गोटेचा सर ,अजय वंडाळे,अरुणजी खिरोडकर ,सुरेश इंगळे ,आशिष सारसर ,प्रकाश बगाडे,राम इंगळे ,राजू हिस्सल ,रमेश कोथळकार ,युवा मोर्चा कार्यकर्ते अक्षय देशमुख ,मोहित सरप,पंकज देशमुख ,ज्ञानेश्वर कोथळकार ,शेक.सोहेल.परम राजपूत ,विठ्ठल गावंडे ,महेश राजपूत ,शुभम चंडाले  ,शरद खवणे,गौरव डोबे व पदाधिकारी बहुसंखेने उपस्थित होते.यावेळी युवा मोर्चा तर्फे तिरंगा एकता रली शहरातून काढण्यात आली.त्यामध्ये युवा मोर्चा चे पदाधिकारी व विद्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रँलीमध्ये सहभाग घेतला व दुर्गा चौक येथे शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजीसा युवा मोर्चाचे सचिन देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ यांनी केले.

Previous Post Next Post