जळगाव जामोद शहरातील पेट्रोल पंप ते दुर्गा चौक पर्यंतचे पक्या टिन पत्र्यांचे केलेले अतिक्रमण तात्काळ हटवा समाजवादी पार्टीचे निवेदन...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद येथील अतिक्रमन पेट्रोल पंपा पासून हटवण्यात यावे अशी मागणी मुख्य   कार्यकारी अधिकारी नगर परिषद यांना समाजवादी पार्टीच्या वतीने दिनांक ६ आँगष्ट रोजी निवेदन देण्यात आले. जळगाव जामोद नगर परिषद अंतर्गत पेट्रोल पंपा पासून ते दुर्गा चौक पर्यंत लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात टिन पत्राचे दुकान बनवून ठेवलेले आहे. या लोकांनी केलेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे.जे लोक दुर्गा चौक मध्ये हातगाड्या घेऊन फ्रुट विक्री तसेच हात गाडीवर चहा व्यवसाय थाटून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत जिवन जगत आहे अश्या गोरगरीब कष्ट करी लोकांना नगर परिषद नाहक त्रास देउ नये.हातगाडी वर व्यवसाय करणारे हे लोक अतिक्रमण करून तिथे बसलेले नाहीत तसेच हे लोक  दोन ते तीन तास लहान उद्योग करत आहेत! जे 3 पत्राने बनविलेले दुकाने आहेत तेच फक्त नगरपरिषदेने उठवावे असे निवेदनामध्ये नमूद केले आहे.अशा आशयाचे  निवेदन समाजवादी पार्टी शहराध्यक्ष सय्यद नफीस, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अजहरउल्ला खान, बुलढाणा जिल्हा सचिव लियाकत खान, जळगाव  तालुका अध्यक्ष मुस्ताक जमदार, डॉक्टर जावेद सिद्दिकी,रिजवान खान,जिल्हा उपाध्यक्ष जाहिद खान,सादिक पठाण, एके पठाण, युसूफ भाई, एआर साबिर,जहीर अहमद व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post Next Post