सेवानिवृत्त पोलीस पाटील विठ्ठल कडाळे यांचा जलंब पो. रटेशन मध्ये सत्कार.


 सुरज देशमुख:- बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी RC24 न्युज 

 जलंब पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या तरोडा डी गावचे कार्यरत पोलीस पाटील  विठ्ठल कडाळे यांचा सेवानिवृत्तीबद्दल ठाणेदार धीरज बांडे यांनी सत्कार  केला.   शेगाव तालुक्यातील तरोडा डी या गावात विठ्ठल कडाळे यांनी ३३वर्षे पोलीस पाटील म्हणून सेवा दिली.जलंब पोलीस स्टेशनमध्ये २ ऑगस्ट रोजी त्यांचा सत्कार समारंभ तसेच आगामी सण-उत्सव यानिमित्त पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली.बैठकीमध्ये सेवानिवृत्त पोलीस पाटील  कडाळे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन ठाणेदार धीरज बांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष आखरे यांच्यासह   १६ गावचे पोलीस पाटील तसेच जलंब पोलिस स्टेशनचे संजय पहूरकर,गोविंदा व्हनमाने, गजानन गव्हांदे, विलास पवार यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post