दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ७४ वा वर्धापन दिनाचा ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम उपविभागीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना देत उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी ध्वजारोहन कार्यक्रमाला जळगाव जामोद च्या तहसिलदार श्रीमती शितल सोलाट, नायब तहसीलदार सूर्यवंशी साहेब, नायब तहसीलदार मार्कंड, पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे,जळगांव जामोद नगरपरिषदेचे शिक्षण सभापती रमेश ताडे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख,माजी सैनिक,जेष्ठ पत्रकार नानासाहेब कांडलकर,नगरसेवक अँड संदिप मानकर, पत्रकार लियाकत खान,वंचित बहुजन आघडीच्या नेत्या,राष्ट्रवादी चे संदिप उगले,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे यांच्यासह विविध पक्षांचे नेते सामाजिक कार्यकर्ते वकील बांधव यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक ध्वजारोहण समारंभाला उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते तहसील जळगाव जामोद येथे ध्वजारोहण संपन्न...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
