चिखलदरा :-
चिखलदरा तालुक्यातील गौलखेडा बाजार येथील पत्रकार राजु भास्करे हे सातत्याने कोरोना काळात आपली जिवाची पर्वा न करता यांनी त्यांच्या लेखनीत कमी होवु दिली नाही. त्यांनी सातत्याने मेळघाटातील बातम्या प्रकाशित केले असून त्यांचा कामाचा लेखाजोखा पाहून आज १५ आॅगष्ट रोजी तहसील कार्यालय व वन विभाग कार्यालय मार्फत कोरोना योध्दा म्हणून येथील तहसीलदार कु. माया अशोक माने मॅडम यांच्या हस्ते राजु भास्करे यांना सन्मानित करण्यात आले आहे.या कार्यक्रमा मध्ये चिखलदरा येथील तहसीलदार माने मॅडम यांनी आपल्या भाषणात पत्रकारना चांगले प्रकारे मार्गदर्शन केले असता एकच टाळ्या चा गडगडाट झाले. या कोरोना योध्दा सन्मानित करण्याच्या कार्यक्रमात पंचायत समिती चिखलदरा चे सभापती बंन्सी भाऊ जामकर चिखलदरा नगराध्यक्ष सोमवंशी मॅडम चिखलदरा येथील तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी चिखलदरा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच तालुक्यातील पत्रकार बांधव व चिखलदरा शहरातील नागरीक म्हणून उपस्थित होते.
