वरणगाव कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा...


 वरणगांव प्रतिनिधी:-सुनिल पाचपोळ.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज द्वारा संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी परिसरातील कोविड योध्दा म्हणून डॉ राहुल भोईटे यांचे शुभ हस्ते ध्जारोहण करण्यात आले. तसेच महाविद्यालय विकास समिती सदस्य ऍड. धिरेंद्र प्रतापराव देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अनुजा राहुल भोईटे व सेवानिवृत्त जेष्ठ प्रा आर व्ही मोते  होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य प्रा. डॉ. बी के सोनवणे होते.प्रमुख मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ अनिल शिंदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संध्या निकम यांनी केले. एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा अशोक चित्ते यांनी वृक्षारोपण संबंधी नियोजन केले.

Previous Post Next Post