हल्ली सोशल मीडियावर अनेक जण हातात शस्त्र घेऊन भाईगिरीचे व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करत समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत असतात.असे व्हिडिओ तयार करणाऱ्याच्या मुसक्या देखील पोलीस आवळतात पोलीसच अशाप्रकारे विडिओ तयार करून भाईगिरी करत असेल तर आपण काय म्हनाव असाच एक धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात समोर आला आहे.जिल्ह्यातील चांदुर बाजार पोलीस स्टेशनचा पोलीस कर्मचारी महेश काळे याने हातात पिस्तूल सारखे शस्त्र घेऊन एक व्हिडिओ तयार केला होता.दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन यांनी घेतली असून या कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे,महेश काळे या पोलिस कर्मचाऱ्यांनी हातात पिस्तूल सारख्या शस्त्राचा वापर करून व्हिडिओ तयार करून त्याच्यात भाईगिरी सारख्या भाषेचा वापर केला होता.त्याच पार्श्वभूमीवर शासकीय गणेशाचा व शस्त्राचा चुकीच्या पध्दतीने गैरवापर केल्याचा व बेशिस्त व बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ठेवला असून त्याला आता निलंबित केले आहे....
हातात बंदूक घेऊन व्हिडिओ व्हायरल करणे भोवले;अमरावतीत पोलीस कर्मचारी निलंबीत...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
