फेब्रुवारी / मार्च -२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता -१२ वीच्या परीक्षेमध्ये स्थानिक केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर व कला,वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचीतील सलग सहाव्यांदा १००% निकाल लागला आहे. सदर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य (मराठी), वाणिज्य (इंग्रजी) व विज्ञान हया शाखा असून यातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नांव उज्वल केले आहे.फेब्रुवारी । मार्च-२०२१ मध्ये पार पडलेल्या मंडळ परीक्षेसाठी सहकार कनिष्ठ महाविद्यालयातुन विज्ञान व वाणिज्य (इंग्रजी माध्यम) शाखेतील एकुण ६४ व कला, वाणिज्य (मराठी माध्यम) शाखेतून ८० असे एकुण १४४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. प्रथम क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेतून कु. फाल्गुनी अनिल सातव हिला ८४.८३ टक्के गुण तर कला शाखेतून विशाल श्रावण गव्हाळे याला ७५ टक्के गुण, वाणिज्य शाखेतून कु. चैतन्य बाळकृष्ण बघे हिला ८५ टक्के गुण तर वाणिज्य (इंग्रजी) मधून कु. ममता राजेंद्र पारस्कारला ९०.६७ टक्के गुण मिळाले. व्दितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेतून कु. पूनम शंकर राउत हिला ८३.६७ टक्के गुण तर कला शाखेतून समीर इतबार मासरे याला ७३.५० टक्के गुण, वाणिज्य शाखेतून कु. कांचन राजू बढे हिला ८३.१६ टक्के गुण तर वाणिज्य (इंग्रजी) मधून पूजा विजय जाधव हिला ८९ टक्के गुण मिळाले. यामध्ये प्राविण्य श्रेणीत ८१, प्रथम श्रेणीत ६४ विद्यार्थी आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केला आणि छोरीया सहकार विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. किशोर केला, मुख्य संयोजिका डॉ. सौ. स्वाती केला, प्राचार्य विनायक उमाळे, प्रकाश भुते, विषय शिक्षक सर्व श्री विनोद इश्वरे, राजेश आठवले, अमित धुत, गोपाल गायकी, ज्ञानेश्वर गुहे, हेमलता राजपूत, सौ. गीता पलन, सौ. मधुरीना चोपडे, कु. ज्योती पालीवाल आदींनी भरभरुन कौतुक केले आहे.
केला आणि छोरीया सविमं व कनिष्ठ महाविद्यालयाची १००% निकाल परंपरा कायम..
जळगांव जामोद प्रतिनीधी: -
