जळगांव जामोद प्रतिनिधी:-
जळगांव जामोद येथिल स्वर्गिय विर गणपतराव इंगळे क्रुषि महाविद्यालय येथे बि एस सी ॲग्रीला शिक्षण घेत असलेले क्रुषि दुत रोशन सुनिल पवार यांनी वाडि खुर्द शिवारातील प्रेमसिंग राजपुत यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन शेतीच्या अद्यावत तंत्रज्ञान व आधुनिक शेतीची तसेच फवारणी बद्दल शेतकरयांना मार्गदर्शन केले.सातपुडा शिक्षण संस्था व डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न क्रुषि महाविद्यालय जळगांव जामोद येथे रोशन पवार हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य यौगेश गवई, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापिका कु विद्या कपले, कार्यक्रमाधिकारी प्रा, अविनाश आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रुषि दुताने जळगांव जामोद येथिल शेतकऱ्यांचे अनुभव जाणुन घेवून त्यांना मार्गदर्शन केले.
