वर्कऑर्डर निघूनही रस्त्याचे काम खोळंबले ,नागरिकांना जीव मुठीत धरून करावा लागत आहे पाण्यातून प्रवास...




वरणगाव प्रतिनिधी:-सुनील पाचपोळ .

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील महात्मा गांधी ते सिद्धेश्वर नगर हा एक किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्थेत आहे, पावसाळ्यामध्ये पुलाखाली साठलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे ये-जा करण्यासाठी खूप हाल होत आहेत.स्थानिक आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून या रस्त्याच्या कामाची नोव्हेंबर 2020 मध्ये वर्कऑर्डर ही निघाली, परंतु अद्याप पर्यंत या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही, सरकारी काम आणि सहा महिने थांब याप्रमाणे हे काम अद्याप पर्यंत थांबलेले आहे ,त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे, डपक्क्यांमध्ये साठलेल्या पाण्यात अनेक जणांना चे अपघातही झालेले आहेत, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडले आहे, रस्त्याच्या कामाला केव्हा सुरुवात होईल नागरिकांचा जीव भांड्यात पडेल ही वाट आता तरी पाहावी लागत आहेत रस्त्याचे काम पूर्ण व्हावे ही स्थानिक नागरिकांची मागणी आहे

Previous Post Next Post