जळगाव जामोद शहरातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने देण्यात आले निवेदन...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

स्थानिक जळगाव जामोद शहरांमध्ये आज रोजी सर्रासपणे अवैध धंदे सुरू असून शहरांमध्ये अवैध धंद्या वाल्यांनी थैमान घातले असून जळगाव जामोद शहरामध्ये आज रोजी गल्ली गल्ली मध्ये प्रत्येक चौकात अवैध धंदे चालू आहेत जळगाव जामोद शहराची शान असलेले दुर्गा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मानाजी चौक जुने बस स्टँड या ठिकाणी खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत त्यामुळेच जळगाव जामोद शहरात बाहेरगावाहून येणारे वाममार्गाला लागल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत तसेच यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत या अवैध असल्यामुळे महिला व विद्यार्थ्यांनिंना मोठ्या प्रमाणात लहान त्रास सोसावा लागत आहे. जळगाव जामोद शहरातील अवैद्य धंदे बंद न झाल्यास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा लोकशाही मार्गाने आंदोलन करेल अशा आशयाचे निवेदन दिनांक 11 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांना देण्यात आले आहे सदर निवेदन देतेवेळी परीक्षित ठाकरे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष, उमेश येउल भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष, अक्षय देशमुख भाजपा युवा मोर्चा शहरचिटणीस, प्रतीक खिरोडकार, ज्ञानेश्वर कोथळकर, सोहेल इक्बाल शेख, सचिन देशमुख, गणेश खेर्डेकर, अमोल ढगे, वैभव जाधव, विठ्ठल खोद्रे, यांच्यासह बहुसंख्य भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post