राजु भास्करे :-चिखलदरा.
पावसाळा सुरू होऊन सुद्धा भर पावसाळ्यात मेळघाटात घोटभर पाण्यासाठी नागरिकांना पहाटेपासूनच पायपीट करावी लागत असल्याचे दाहक वास्तक मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील बोरी गावात पाहायला मिळत आहे येथील माय माहुलींना दररोज तीन चार किलोमीटर अंतरावरून नाल्या खोल्यातून पाणी आणावे लागत आहे परिणामी पुन्हा एकदा मेळघाटातील पाणीटंचाई चा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील आदिवासी बहुल बोरी या गावात भर पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला गावातील नागरिकांची गेल्या दोन तीन महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती सुरू आहे दररोज तीन चार किलोमीटर अंतरावरून येथील माय माहुलींना पाणी आणावे लागत आहे याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे मेळघाटातील पाणी टंचाई जितकी नैसर्गिक आहे तितकीच ती प्रशासननिर्मित आहे बोरी गावातील पाणीटंचाई सुद्धा प्रशासन निर्मित आहे येथील पाणीपुरवठा योजना सुद्धा गेल्या दोन महिन्यांपासून बंद पडली आहे परिणामी येथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे तसेही मेळघाटात गेली कित्येक वर्षापासून मेळघाटची जनता पाण्यासाठी वणवण फिरतात तरी सुद्धा मेळघाटात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासन प्रयन्त करत नाही केवळ तात्पुरती सोय उपलब्ध करून देण्याकडेच प्रशासनाचा कल दिसून येतो परिणामी करोडो रुपये खर्च करून सुद्धा दरवर्षी मेळघाटात नागरिकांना पाण्यासाठी झळा सोसाव्या लागतात सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेळघाटात दूरगामी आणि परिणामकारक योजना कधीच राबविल्या जात नसल्याने मेळघाटचा वनवास अजूनही संपता संपत नाही त्यामुळे मेळघाटच्या पदरात अशी उपेक्षा, वनवास का यावा याचं उत्तर शासनाने दिलं पाहिजे नाहीतर आदिवासी बांधवांना केवळ मतदानापुरतं वापरून इतर वेळी त्यांना वाऱ्यावर सोडणं बरोबर नाही यासाठी मेळघाटात दरवर्षी निर्माण होणारा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याची गरज आहे.
**मेळघाटातील पाणी टंचाई जितकी नैसर्गिक आहे तितकीच ती प्रशासननिर्मित आहे मात्र मेळघाटातील पाण्याचं दुर्भिक्ष्य शासनाच्या नजरेआड आहे शहरात घराघरापर्यंत नळ योजना पोहोचल्या, रस्ते चकचकीत झाले, मेट्रो ट्रेन आली मात्र मेळघाटचा वनवास अजूनही संपता संपत नाही दूरगामी आणि परिणामकारक योजना या भागात कधी राबविल्या जात नाही त्यामुळेच आज मेळघाट विकासापासून कोसोदूर आहे :-बंड्या साने संस्थापक खोज
