जळगाव जामोद महसूल विभागातील रिक्त असलेली पदे तात्काळ भरावी :- अक्षय पाटील..


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जा. येथे असलेले उपविभागीय कार्यालय तसेच तहसील कार्यालय यामध्ये बरेच दिवसांपासून अनेक पदे रिक्त आहेत.त्यामुळे रिक्त असलेल्या पदांचा प्रभार हा इतरत्र अधिकार्‍यांना/कर्मचाऱ्यांना दिलेला आहे. त्यामुळे अधिकरी व कर्मचा-यांना कामाचा ताण हा चांगलाच वाढलेला आहे.जळगाव जामोद येथील या ठिकाणी दोन्ही कार्यालयाला मिळून एकच नायब तहसीलदार आहे .त्यामुळे रिक्त असलेले नायब तहसीलदार यांची सुद्धा पदे भरण्यात यावे.या वाढलेल्या कर्मचाऱ्यांच्या ताणामुळे याचा फटका सर्वसामान्य तळागाळातील शेतकऱ्यांना .सर्वसामान्य नागरिकांना होतो.कुठे तरी हा अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य लोकांचा, गरिबांचा,त्रास कमी व्हायला हवा.या मागणी करीता जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांची श्री अक्षय पाटील यांनी भेट घेऊन जळगाव जामोद येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयातील  रिक्त असलेली पदे भरावी अशी मागणी केली.

Previous Post Next Post