जळगाव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव शिवारातील अमोल बबन कापरे या शेतकऱ्याने सुनगाव शेत शिवारातील गट नंबर 160 वरील शेतात ८ जून २०२१ रोजी कपाशीची लागवड केली होती. शेतकऱ्याने कपाशी पिकाला दोन फवारणी व दोन खते दिली होती तसेच कपाशी पिकाची मशागत चांगल्या प्रकारे केली.परंतु कपाशी आज रोजी अडीच ते तीन फूट उंच बहरलेली असताना अचानक मर रोगाचा प्रादुर्भाव आल्याने अमोल कापरे या शेतकऱ्यांने आपल्या शेतातील एक एकर कपाशी चक्क उपटवून टाकली आहे. या कपाशीच्या मुळांच्या लगत जमिनीत मोठ्या प्रकारचे किडे दिसून येत आहे तरी ही कपाशी बहरलेली असताना शेतकऱ्यावर पिक उपटून टाकण्याची वेळ आली आहे. तरी संबंधित कृषी विभागाने अमोल कापरे यांच्या शेतामध्ये जाऊन सदर कपाशी पिकाचा पंचानामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी अमोल कापरे या शेतकऱ्याने केली आहे.
