आदिवासी उपयोजना शाळेतील शिक्षकांना चार महिनेपासून पगार नाही....




 अमरावती जिल्हा प्रतिनिधी :-राजु भास्करे.

आदिवासी जनजाती क्षेत्र अंतर्गत मेळघाट मध्ये चिखलदरा व धारणी मिळून सहा शाळा आहेत.तर संपूर्ण महाराष्ट्रमध्ये एकूण 144 शाला आहेत.या शाळाचे वेतन अनुदान लेखाशीर्ष क्र.22021901 नुसार मंजूर झाले आहे. हा लेखाशीर्ष आदिवासी क्षेत्रातील जिल्यातील  शाळांना अनुदान देण्याकरिता तयार करण्यात आला असून या लेखाशीर्षकांच्या निर्मितिला बारा वर्षया शाळेतील शिक्षक संख्या उलटून गेले आहे.हे लेखाशीर्ष बंद करून सर्वसाधारण पद्धतीने वेतन काढले जात नाही.नियमानुसार तीन वर्षात वेतन नियमित काढणे अनिवार्य आहे.परंतु अधिकारी वर्गाचा उदासीन धोरणामुळे व कामचुकार पणामुळे बारा वर्षानंतर ही शक्य झाले नाही.जिल्ह्यात या शिक्षकांनाची संख्या 20 असल्याने यांच्या समस्या समजून घेऊन सोडवायला एकही शिक्षक संघटना लक्ष द्यायला तयार नाही. बरा वर्षांपासून काही शिक्षक आमदार होऊन गेलेत परंतु त्यांनी सुद्धा या समस्येकडे कानाडोळा केला. वेळोवेळी आजी माजी शिक्षक आमदारांना भेटून ही त्यांचे कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. वित्त विभागाकडून मंजूर केलेल्या अनुदानातून जिल्ह्याला कमी अनुदान प्राप्त होते. प्रत्येक वेळी यासाठी प्रशासन जबाबदार कि शिक्षक प्रतिनिधीची कमतरता असा प्रश्न समस्याग्रस्त शिक्षकांना पडला आहे. चार महिन्यापासून शिक्षकांना पगार नसल्याने त्यांचे घरं खर्च व मुलांचे शिक्षण व आईवडिलांचा आजार व त्याचेवर असलेले बँकेचे गृहकर्ज व इतर कर्जाचे हप्ते फेडणे कठीण होत आहे. त्यासाठी बँकेचा सतत तगादा यामुळे सदर शिक्षक मानसिक तनावात जगत आहेत.या तणावमुळे यापैकी काही शिक्षकांना सतत तणावामुळे रक्तदाब, मधुमेह या आजाराची लागण झाली आहे.सदर शिक्षकांना नियमित वेतन देण्याची मागणी या शिक्षकांनी केली आहे.

Previous Post Next Post