कोरोनाच्या काळामध्ये सर्वदूर प्रवाशी वाहतूक बंद होती, आता सर्व अनलॉक झाल्याने धारणी ते अकोट रोड वर खाजगी बस व अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येत आहे. यां खाजगी बस व अवैध वाहनधारकांकडून प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरु केली आहे.धारणी ते अकोट चे प्रवास भाडे चक्क दोनशे रुपये घेतले जात असल्याने मेळघाट मधील लोकमध्ये असंतोष उफाळून येत आहे.यापूर्वी अकोट धारणी करिता महामंडळाची लहान (गुड्डीगाडी )लालपरी सुरु होती. परंतु काही कामचुकार अधिकाऱ्यांनी त्यांची डोकेदुखी दूर करण्यासाठी हा मार्ग वाहतूकसाठी योग्य नसल्याचे सांगत ही बस बंद केली. जर हे मार्ग बसच्या वाहतूकसाठी योग्य नाही तर खाजगी बसेसं मोठया प्रमाणात सुरु आहेत. त्यांना कश्याच्या आधारावर परवानां देण्यात आला.या खाजगी बसेस मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बस च्या वर टब वर बसून जीव धोक्यात टाकून प्रवास करतात. शासन उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. परंतु या बाबीची गांभीर्याने दाखल न घेता स्थानिक आदिवासी प्रवाश्यांची विडंबना करीत आहे.प्रवाशांसाठी काहीतरी उपाययोजना करून तात्काळ महामंडळाची एस. टी.सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अकोट धारणी व परतवाडा ते धारणीढकणा मार्गे महामंडळ बस सुरु करण्याची मागणी.खाजगी बस करते प्रवाशांची लूट..
अमरावती जिल्हा प्रतिनिधी:-राजु भास्करे.
