जळगाव जामोद नगरपरिषद मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा...


 जळगाव जामोद प्रतिनिधी :-

जळगाव जामोद नगरपरिषदेने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामा विरोधात आणि लाखो रुपयांची अफरातफर केल्याच्या विरोधात जळगाव जामोद येथील गोबजीखेल भागातील रहिवाशी अनंता ओंकार चरखे व दीपक विष्णू बुले यांनी स्वातंत्र्यदिनी उपोषणास बसण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिला आहे.  निवेदनात म्हटले आहे की दिनांक 1 एप्रिल 2017 चे 31 मार्च 2021 या कालावधीमध्ये विशेष रस्ता दुरुस्ती अनुदान, नगरोत्थान, दलित वस्ती सुधार योजना, घनकचरा व्यवस्थापन, नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत झालेली कामे, जिल्हा नियोजन समितीमार्फत झालेली कामे, नगर विकास विशेष निधी अंतर्गत झालेली कामे, शहर सौंदर्यीकरण, आरोग्य विभाग,  क्रीडा विभाग, कचरा उचलणे अक्षय देशमुख यांच्या करारनाम्यावर झालेली कामे, महिला व बालकल्याण व नगरपरिषद फंडा अंतर्गत झालेली कामे तसेच बांधकाम विभागात लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून 9 ऑगस्ट 2021 पर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध निकृष्ट दर्जाची कामे मुदतीपूर्वी उखडलेले रस्ते, वाहून गेलेली नाले, घनकचरा या सर्व कामाची चौकशी करावी अन्यथा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवशी शिवनीतिने जळगाव जामोद शहरातील कुठल्याही शासकीय इमारतीवर कुठल्याही क्षणी आमरण उपोषण सुरू करण्यात येईल अशा पद्धतीची निवेदन अनंता  चरखे व दीपक विष्णू बुले यांनी दिले आहे.

Previous Post Next Post