जळगांव जा.प्रतिनिधी:-
दिनांक 08 ऑगस्ट 2021 रोजी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान आमदार अबू आझमी यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जामोद समाजवादी पार्टी च्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजहर खान, समाजवादी पार्टी जिल्हा महासचिव लियाकत खान, जिल्हा संपर्कप्रमुख सहिद भाई, तालुकाध्यक्ष मुस्ताक जमदार, तालुका कार्याध्यक्ष सय्यद अनिस, शहराध्यक्ष नफीस भाई, शाहरुख अध्यक्ष रिजवान खान, जहीर अहमद यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.
