स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात 9 ऑगस्ट क्रांती दिन जल्लोषात साजरा..

बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.

 क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला 8 ऑगस्ट रोजी जळगाव जामोद काँग्रेस च्या वतीने जळगाव शहरात *मशाल रॅलीचे* आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रॅलीकरीता उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. सर्वप्रथम दुर्गा चौक येथे शहीद स्मारकाला अभिवादन करण्यात आले तदनंतर स्व. शिवशंकर भाऊ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहीद जवान तसेच नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच सतत अकरा वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार स्व. गणपतरावजी देशमुख यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. देशभक्तीपर गीतांसहित, देशभक्तीपर नार्यानी जळगाव जळगाव चा परिसर दुमदुमून गेला.  यावेळी दुर्गा चौक ते चौभारा ते मानाजी चौक  ते चावडी चौक ते बैलजोडी चौक येथे सांगता करण्यात आली. यावेळी भारत मातेच्या वेशात अंजली श्रीकृष्ण केदार होती तर सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जळगाव जामोद मतदार संघाच्या काँग्रेस पक्षनेत्या डॉ.सौ.स्वाती संदीप वाकेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, शहराध्यक्ष अर्जुन घोलप, महीलांच्या तालुकाध्यक्ष राधा खापट, महिलांच्या शहराध्यक्ष मीनाताई सातव, युवकचे प्रदेश सरचिटणीस अभिजीत अवचार, युवकांचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद अढाव, युवक जिल्हा सरचिटणीस अजय ताठे, विधानसभा प्रमुख शेख अफरोज, लोकांचे विधानसभा उपाध्यक्ष अमोल मानकर, नगरसेवक सर्वश्री श्रीकृष्ण केदार, ऍड. संदीप मानकर, कलीम मिस्त्री, चित्राताई इंगळे,परवीन देशमुख, आरती  केदार, मनीषा बगाडे, अर्चना क्षीरसागर, नलिनी उमाळे, प्रतिभा बोडदे, पल्लवी गावंडे, सुवर्णा मानकर, युवकचे तालुकाध्यक्ष निशिकांत देशमुख, शहराध्यक्ष राजिक, कार्याध्यक्ष दिनेश काटकर, युवकांचे सै हुसेन राही, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष राजू मुल्लाजी, युवकांचे धनंजय बंबटकार, तसेच विजय हिस्सल, जामोद उपसरपंच सलामखा, अकोला सरपंच वसंता बोदडे, वसंत धूरडे, सुनील येनकर, किसना दामधर, बंटी कळसकर, सचिन हरमकार, एड.रवींद्र काकडे, जुबेर पटेल, हुसेन डायमंड, सचिन जाधव, वैभव वर्गे, मोहन बोडखे,महेंद्र बोडखे, नवल मावळे, किशोर घटे, हारून, शालिग्राम भोपळे, मयूर राऊत, सुपडा पाटील, सुनील ढोले, समाधान नानकदे, विलास ढगे, रामभाऊ डोबे, शंकर राऊत, शे.अफरोज, शे.गुड्डू, राजा जमादार, समीर, शे.जहीर,योगेश घोपे,शिवा जाणे, पंजाब जाणे, मन्सूर , इमरान, अस्लम, ज्ञानेश वानखडे,  चोपडे, मिलिंद वानखडे, सचिन बुंदेले, जोगेंद्र वानखडे, शे.शहजाद, मुदससीर, मोहसीन व इतर उपस्थित होते.

 

Previous Post Next Post