हिवरखेड नगरपंचायत घोषित करा,अ, भा, ग्रा,पत्रकार संघाचा आमरण उपोषणाचा ईशारा,

हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड गाव मोठे असून सैनिकांचे गाव ओळखले जात आहे  ,गावातील रहिवाशांनि वेगवेगळ्या क्षेत्रात मोठं मोठी पदे भूषविली आहेत, गावाची लोकसंख्या ५० हजाराच्या जवळ आहे, गावात सर्व सोयी सुविधा गावकऱ्यांना उपलब्ध व्हाव्या या करिता नगरपंचायत करा अशी मागणी ग्रामपंचायत हिवरखेड चे सरपंच सौ सीमा राऊत, उपसरपंच रमेश दुतोंडे , ग्रामसेवक गजानन मेंतकर, तसेच पोलीस स्टेंशनचे ठाणेदार धीरज चव्हाण , तसेच पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष कैलासबापू  देशमुख, मनोहर सुने, सुरेश साळवे, यांच्याद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना हिवरखेड येथील अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटनेच्या वतीने , प्रथम नागरिक, पत्रकार राजेश पांडव, अनिल कवळकार, संदिप इंगळे, जितेश कारिया,अर्जुन खिरोडकार, यांच्या वतीने येत्या १५ अगस्ट स्वतंत्र दिनापासून आमरण उपोषण करण्याचे निवेदन देण्यात आले, १५ अगस्ट पर्यत हिवरखेड नगरपंचायत घोषित करा, अन्यथा आमरण उपोषण गावाच्या हितासाठी करू, अशी मागणी करण्यात आली,

Previous Post Next Post