अस्वलाच्या हल्ल्यात सरपंच पुत्र गंभीरीत्या जखमी..


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

मेळघाटच्या घटांग भुलोरी च्या सीमेलगत असलेल्या लुगडदरी गावाच्या शेतशिवारात तेथील सरपंच यांचे पुत्र दयाराम खुशीलाल यांच्यावर अस्वलीने जीवघेणा हमला केला, त्यामध्ये दयाराम गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ बैतुल जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दयारामची प्रकृती चिंताजंक असल्याची माहिती आहे.मेळघाट मध्ये दिवसेंदिवस  वण्यप्रण्यांच्या हल्ल्यात वाढ होताना दिसून येत आहे. गावाच्या शेताशिरलगत व्याघ्र प्रकलपाच्या सीमा यऊन ठेपल्या आहेत त्यामुळे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करत आहे. शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी जागरण करतो त्यादरम्यान वन्यप्राणी माणसांवर हल्ला करत आहेत.

Previous Post Next Post