श्रावण सोमवार आले अजून देऊळ बंदच,भाविकांची नाराजी,


 हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड नजीक असलेल्या तळेगाव बाजार येथे प्रसिद्ध मनसा माता मंदीर आणि प्रसिद्ध सोमेश्वर महादेव मंदिर असून भाविक नवरात्रात मनसा माता मंदिरात दिसून येतात तर श्रावण मासात सोमेश्वर महादेव मंदिरात  दर्शनासाठी दिसून येतात, परंतु गेल्या बऱ्याच दिवसापासून कोरोनामुळे मंदिरांवर ग्रहण आले आहे, परंतु  आता मात्र कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला असून इतर काही  कठीण व्यवसायांना शासनाने सवलती दिल्या आणि मंदीरा सारखे धार्मिक पार्थनास्थळे बंद केली, आणि मदिरा खुली केली हा न्याय की अन्याय अशा शासनाच्या वागण्याने भाविनकांमध्ये  नाराजी पाहण्यास मिळते, प्रत्येक श्रावणमासात तळेगाव सोमेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी दिसायची आता मात्र श्रावण येऊनही मंदिर असल्याने भाविक वर्गात नाराजी पाहण्यास मिळते, श्रावण मासात प्रत्येक सोमवारी महिला वर्ग महादेवाची उपास आराधना करून बेल फुल वाहून भक्तिमय वातावरण करतात, परंतु मंदिर बंद असल्याने कुठं पूजा अर्चना  करायची  असा प्रश्नन महिला भावीक वर्गाला पडला आहे, श्रावण मासाच्या पहिल्याच सोमवारी सोमेश्वर मंदिर उघडा शासनाने हे देऊळ उघडण्याचा आदेश द्यावा  मागणी येथील भक्तजन करत आहेत,

🔷प्रतिक्रिया..🔷

मदिरा चालू आणि देऊळ बंद,

 कुठे रिकामी टेकळे व्यवसाय चालू आणि देऊळ बंद हा शासनाचा कुठला नवा नियम आहे, आमच्या गावचे हे प्रसिद्ध सोमेश्वर संस्थान श्रावण मासात उघडे ठेवण्याचे आदेस शासनाने द्यावे,

राम भड,

तळेगाव बु,

Previous Post Next Post