उत्कृष्ट नायब तहसिलदार म्हणुन लोणार येथील हेंमत पाटील यांचा जिल्हाधिकारी हस्ते सत्कार..


 संदीप मापारी पाटील:-लोणार प्रतिनिधी.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने 1 ऑगष्ट्र महसुल दिनाचे औचित्य साधुन जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे दिनांक 5 ऑगष्ट रोजी लोणार तहसिल कार्यालयाचे दंबग नायब तहसिलदार हेंमत पाटील यांना उत्कृष्ट नायब तहसिलदार म्हणुन जिल्हाधिकारी एस रामामुर्ती यांनी सन्मानित केले असुन त्यांना हा पुरस्कार जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.महसुल विभागामध्ये महसुल वसुली,महाराजस्व अभियान,सातबारा संगणीकरण,नैसर्गीक आपत्ती,कायदा व सुव्यवस्था,दंडाधिकारी चे कामे ई गव्हर्नस इत्यादी कामे पार पाडण्यासाठी नायब तहसिलदार हेंमत पाटील यांना पुरस्कार देण्यात आली रेती माफीच्या विरोधात ॲक्शन मोड मध्ये काम करणारे नायब तहसिलदार हेंमत पाटील आपल्या दंबग कारवाई मुळे तालुक्यातच नव्हे तर जिल्हयात चर्चेत आले आपल्या निवडीचे श्रेय ते लोणारचे कर्तव्यदक्ष तहसिदार सैफन नदाफ,मंडळ अधिकारी तलाठी व महसुल कर्मचाऱ्याना देतात सर्वाच्या सहकार्याने हा बहुमान मिळाल्याचे हेंमत पाटील यांनी सांगीतले नायब तहसिलदार हेंमत पाटील यांना मिळालेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एस राममुर्ती,जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया,अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय अधिकारी गणेश राठोड आदी उपस्थीत होते.

Previous Post Next Post