अल्केश महल्ले माजी सरपंच दिल्ली येथे कोरोना योद्धा 2021 पुरस्काराने सन्मानित दिल्ली नोयडा येथे सरपंच सेवा महासंघ व सरपंच माझा येथे सुदर्शन न्युज चॅनल चे आयोजन...


 राजु भास्करे /चिखलदरा 

चिखलदरा तालुक्यातील गौरखेडा बाजार ग्रामपंचायत चे माजी सरपंच तथा सरपंच सेवा महासंघाचे चिखलदरा तालुकाध्यक्ष यांनी गावामध्ये केलेले विविध प्रकारचे सर्वांगिण विकासकामे तसेच कोरोना काळात गौरखेडा बाजार गावात केलेली वेगवेगळ्या उपाययोजना या त्यांच्या विविध प्रकारच्या कामांची दखल घेऊन दिल्ली येथे सुप्रसिद्ध राष्ट्रीय न्युज चँनल सुदर्शन न्युज चँनल चे मुख्य संपादक  सुरेशजी चव्हाणके यांच्या हस्ते त्यांना सरपंच माझा - कोरोना योद्धा- आदर्श सरपंच 2021 पुरस्कार ट्राफी व सन्मान चिन्ह देऊन सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाला उपस्थित न राहल्या मुळे याप्रसंगी सदर पुरस्कार सोहळ्याला भारत सरकार केंद्रीय ग्रामविकासमंत्री गिरिराज सिंग यांनी दुरध्वनी द्वारे उपस्थित दर्शवून सर्व पुरस्कार मिळालेल्या सरपंच महोदयांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सुदर्शन न्युज चे संपादक सुरेश चव्हाणके, सरपंच सेवा महासंघाचे राजाध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पाटील, राज्य सपंर्कप्रमुख राहुल उके, राज्य कोषाध्यक्ष सदाशिव ढेंगे, रामनाथ बोऱ्हाडे, डॉ नंदुकुमार गोडगे हे व्यासपीठावर उपस्थित होते व  तसेच महाराष्ट्रातील सरपंच मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post Next Post