कोरोनाच्या मोठ्या लसीकरण मोहीमे अंतर्गत लसीकरणाचा नवा विक्रम झाला आहे. आज म्हणजे १८ सप्टेंबर रोजी १०२ लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द येथे नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.संभाव्य येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणावर लसीकरण करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे अकोट तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव अंतर्गत अनेक खेडे गावामध्ये लसीकरण शिबीर घेऊन नागरिकांना कोविड -19 पासुन सुरक्षित करत आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव यांच्या अंतर्गत येत असलेल्या गावा गावा मध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली आहे. यात १०२ नागरिकांचे लसीकरण एका दिवसाला पूर्ण केले . तसेच उस्पुर्थ प्रतिसाथ नागरिकांनी या लसीकरण मोहिमेला दिला आहे. या मोहिमेला सहकार्य डॉ.जावेद सर उमरा, श्रीमती देवयानी जावरकर एम औ, आरोग्य सेविका नीलिमा गवई, आरोग्य सेविका शारदा इंगळे, सेविका, तारा धुळे, मदतनिस सुमित्रा रंधे, मदतनिस सविता भुडके, आशा सेविका सुनिता इंगळे, आशा सेविका रेखा गवई, तसेच ग्रामपंचायत चे सरपंच सौ. सोनिता प्रमोद सोनोने, सदस्य अमन गवई, वसीम शाहा यांच्या सह गावातील नागरिक प्रफुल लायडे, प्रमोद सोनवणे, महेंद्र गवई, सिद्धार्थ दामले मिलिंद गवई या शिबिराला आदींचे सहकार्य लाभले.
प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द येथे लसीकरण शिबिर.१०२ नागरिकांनी घेतला लाभ.नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद...
अकोला जिल्हा प्रतिनिधी:-राजु भास्करे.