मंगल काकडे:– पिंपळगाव काळे.प्रतिनिधी.
जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील शेतकरी संतोष एकनाथ जाधव यांच्या शेतात सततची नापिकी. दुष्काळ. नैसर्गिक संकटे. कर्ज फेडीची चिंता यातून आलेल्या नैराश्यातून माझे पती यांनी २५/१२/२०२० या रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्या ची नोंद सरकार दरबारी सुद्धा झाली. पण १ लाख रुपयांची आर्थिक मदत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यासाठी वेगवेगळे निकष लावून त्यांना मदतीपासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. घरातील प्रमुख पुरुषाचा मृत्यू झाल्याने त्या शेतकरी कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. अशात शासनाकडून किमान आर्थिक मदत तरी मिळेल अशी भोळी आशा या शेतकरी कुटुंबियांना होती. मात्र त्या आशेवर सुद्धा प्रशासकीय दप्तर दिरंगाईने पाणी फेरले आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची वाताहत झाली असून त्यांना रोजी रोटी व चार घरची धुनी भांडी करून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करावा लागत आहे. मात्र दगडाचे मन असलेल्या प्रशासकीय यंत्रणेला अद्यापही पाझर फुटलेला नाही.माझे पती संतोष यांनी शेतीवर कर्ज घेतले होते व खासगी सुद्धा कर्ज घेतले होते. व नापिकी यातूनच आलेल्या नैराशयामुळे त्यांनी आत्महत्या केली. व मी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची विधवा पत्नी असून मला ज्या पण शासनाच्या विधवा योजना आहे. या सर्व योजनेपासून मी वंचित असून मला या योजनेचा लाभ मिळावा असे मी तहसीलदार शितल सोलाट मॅडम जळगाव जामोद यांना करीत आहे.व मला शासनाकडून मदत मिळावी व मदत न मिळाल्यास मी कंटाळून माझ्या जीवाचे कमी-जास्त झाल्यास याला शासन जबाबदार राहणार आहे.