जळगांव जामोद तालुक्यातील कुरणगाड खुर्द ग्रामपंचायत गेल्या महिनाभरापासून चर्चेत आहे त्यातच गटविकास अधिकारी यांनी ग्रामसभा हि अवैध आहे असुन ती ग्रामसभा पुन्हा घेण्यात यावी असे सरपंच,सचिवांना नोटिस बजावण्यात आले , याबाबत उपसरपंच सौ शारदा उल्हास झाटे यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी बुलडाणा यांना निवेदन दिले या निवेदनात नमूद केले आहे कि सदर ग्रामसभेचा अहवाल गटविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत सचिव यांनी सादर केला त्या अहवालात नमूद करण्यात आले कि सदर ग्रामसभेच्या संदर्भात दवंडि देण्यात आली होती त्या दवंडी ( मुनादि) वर सरपंच यांची सहि आहे व त्यानंतर ग्रामसभेच्या कोरम रजिस्टरवर सरपंच यांची सहि आहे तसेच या सभेत सचिव यांनी सरपंच व ग्रामस्थ यांच्या समोर ग्रामसमित्या निवड करण्याच्या व इतर विषयाचे वाचन केले आणि त्यानंतर तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष निवड करण्यासाठी उपस्थित ११६ ग्रामस्थांचे मतदान घेतले यामध्ये सुद्धा सरपंच व त्यांचे सरपंचपती यांनी मतदान केले ,या सर्व बाबींचा अहवाल सचिव यांनी गटविकास अधिकारी यांना दिला होता , स्थानिक राजकीय दबावापोटी श्री शिवशंकर भारसाकळे यांनी ग्रामसभा अवैध ठरविली , ज्यावेळी सरप़ंच यांच्या असे निदर्शनास आले कि आपल्या गटाचा अध्यक्ष होत नाही त्यामुळे सरपंचपती यांनी सरपंच बाईला कोणालाही न सांगता निघुन गेले व उलट मला विश्वासात न घेता सचिव यांनी ग्रामसभा आटोपली अशी तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती,वरील सर्व बाबींचा विचार न झाल्यास लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा इशारा उपसरपंच व सदस्य यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे या निवेदनावर उपसरपंच सौ शारदा उल्हास झाटे,सौ उषा शंकर राठोड,सौ नंदा एकनाथ वडोदे, संतोष सखाराम घोंगे यांच्या सह्या आहेत.
---------------------------------------------------
🔷सदस्यांची प्रतिक्रिया.🔷
सरपंच यांनी तक्रारीत म्हटले आहे की माझ्या अज्ञानाचा फायदा घेऊन सचिव यांनी ग्रामसभा आटोपली.सरपंच अज्ञानी तर गावाचा कारभार कसा पाहु शकतात.ग्रामसभेच्या सर्व प्रक्रियेमध्ये हजर असतांना अंधारात कसे काय ठेवले.सर्वात महत्वाचे जे ग्रामस्थ ग्रामसभेला आपले सर्व कामधंदे सोडुन हजर राहिले त्या नागरिकांचा ग्रामसभा अवैध जर झाली तर ११६ ग्रामस्थांचा अपमाणाच गटविकास अधिकारी यांनी केला..
