जळगाव जामोद येथील तलावपुरा येथून गोधन चोरीला. मालकाची जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार..


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

स्थानिक जळगाव जामोद शहरात दिनांक २४ सप्टेंबर च्या रात्री अज्ञात चोरट्याने तलाव पुरा येथील अब्दुल राजिक अब्दुल हमीद वय २८ वर्ष यांची गाय चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशी तक्रार गाईचे मालक अब्दुल राजिक अब्दुल हमीद यांनी जळगाव पोलीस स्टेशनला दिनांक २८ सप्टेंबर रोजी दिली आहे. सविस्तर असे की दिनांक २४ सप्टेंबर रोजी अब्दुल राजिक याने अशी तक्रार दिली की शेतीच्या कामासाठी त्यांच्याकडे दोन बैल १ म्हैस,दोन गाई व एक्वा सुरू आहे दिनांक २४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास अब्दुल राजिक यांनी त्यांची सर्व जनावरे घरासमोरील मोकळ्या जागेत बांधून त्यांना चारापाणी करून घरी आले व रात्री जेवण करून दहाच्या सुमारास बाहेर येऊन पाहिले असता सर्व जनावरे बांधलेली होती परंतु दिनांक २५ सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास गाईंचे दूध काढण्याकरिता बाहेर आले असता त्यांनी बांधलेल्या जनावरं पैकी एक गाय दिसत नव्हती त्यांनी सगळीकडे शोध घेतला असता परंतु ती गाय त्यांना मिळून आली नाही. अशा आशयाची तक्रार अब्दुल राजिक यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन ला दिली असता जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेषराव पाटील व पोलीस शिपाई सुनील वावगे यांनी घटनास्थळ गाठुन चौकशी केली असता. त्यांनी गाई मालक अब्दुल राजिक यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध हात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सदर गाई मालकाने त्यांच्या गाईचे वर्णन खालील प्रमाणे दिले आहे एक गावरान गाय लाल रंगाची, शिंगे उभी, तिच्या शेपटीचा गोंडा लाल रंगाचा, तोंडावर दोन्ही बाजूने पांढरा पट्टा, तिचे वय अंदाजे पाच वर्ष किंमत आठ हजार रुपये चोरीला गेली आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.

Previous Post Next Post