महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या जळगांव (जा.) केंद्रामार्फत 'बालस्वातंत्र्यदिन' साजरा...


 जळगांव (जामोद) प्रतिनिधी- 

दिनांक ३१ ऑगस्ट २०२१ रोजी आपल्या देशात बालशिक्षणाची मुहूर्तमेढ  रोवणाऱ्या बालशिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांचा स्मृतीदिवस व बालशिक्षणाच्या प्रणेत्या माराया मॉंटेसरी यांची जयंती आणि बालस्वातंत्र्य दिवस कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करून स्थानिक केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर व कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलडाणा अर्बन चॅरीटेबलचे उपाध्यक्ष तसेच परिषदेचे सल्लागार डॉ. किशोर केला, प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक लोकमत वृत्तपत्रसमुहातर्फे आयडिअल वुमन अचिव्हर अवार्ड विजेत्या, शाळेच्या मुख्य संयोजिका, महाराष्ट्र बालशिक्षण परिषद जळगांव जामोद केंद्राच्या अध्यक्षा डॉ. सौ. स्वाती केला, जिल्हा परिषद शाळा चारबन चे आदर्श शिक्षक दिपक उमाळे होते. तसेच परिषदेचे उपाध्यक्ष तथा प्राचार्य विनायक उमाळे, प्रकाश भुते, योगेश घाटोळे, गणेश जोशी, सचिव तथा पर्यवेक्षिका सौ.अर्चना कुळकर्णी, कोषाध्यक्ष डॉ. दिनेश येऊल, कार्याध्यक्ष राजेश लोहिया, राजेश राठी, रामेश्वर कोकाटे हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व बालशिक्षणात अग्रणीय कार्य करणाया ताराबाई मोडक, मारीया मॉटेसोरी, गणेश देवता व कृष्ण भगवान यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. अंकीता जोध यांनी गायीलेल्या सरस्वती स्तोत्राने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. भारतातील बालशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणा-या ताराबाई मोडकांचा परिचय सौ. वैशाली केला यांनी करून दिला. तर मादाम मॉटेसोरी यांच्या जीवन कार्यावर प्रकाश सौ. सीमा अपाले यांनी टाकला. त्याचबरोबर बालस्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सौ.जयश्री मानकर यांनी माहिती दिली. सदर कार्यक्रमाला संबोधित करतांना डॉ. स्वाती केला यांनी वर्ड फोरम फांउडेशन तर्फे आयोजित दहा देशांची व्हर्चुअल एज्युकेशनल वर्ल्ड टूर व अनेकविध देशाच्या बालशिक्षणाचे कोर्स या उपक्रमातून आलेले अनुभव विशद केले. यावेळी दिपक उमाळे यांनी मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व त्यांची शाळेतील हजेरी १००% रहावी यासाठी आदिवासी बहुल भागात 'एक हात - काना - मात्रा - वेलांटी' उपक्रम राबविलेल्या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती सांगितली. त्यांना आलेले अनुभव विशद केले. कृतीतून शिक्षण, खेळातून शिक्षण, आनंददायी शिक्षण या विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये उपयुक्तता तसेच सद्यस्थितीत ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व सांगितले.विदयार्थी, पालक, शिक्षक व समाजामध्ये 'बालशिक्षण' या विषयाची जागृती तसेच रूजवणूक व्हावी यासाठी परिषदेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन सतत होत असते. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. अरूणा व्यवहारे व सौ. अंकिता जोध यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता गोपाळकाला प्रसादाच्या वितरणाने झाली. या कार्यक्रमासाठी सहकार विद्या मंदिर जळगांव जामोद, वरवट बकाल येथील शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post Next Post