वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ
भुसावळ तालुका कुस्तीगीर संघ कडून महाराष्ट्र राज्यांचे माजी महसुलमंत्री माननीय श्री एकनाथराव खडसे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून एक अनोखा उपक्रम राबवला त्यामध्ये कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून माननीय एकनाथ रावजी खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त पहेलवान ढाबा येथे 100 झाडे पिंपळ, कडुलिंब , वड,असे वृक्षारोपण करण्यात आले आले आहे तालुका कुस्तीगीर अध्यक्ष नामदेव दादा मोरे, उपाध्यक्ष. सुपडू दादा सोनवणे भोई समाज अध्यक्ष पै. एकनाथ दादा भोई, कार्यकर्ते पै. भैया सोनवणे , पैलवान ग्रुप तालुका अध्यक्ष पै .श्रीराम भोई , पै नरेंद्र भोई , सचिन माळी व सर्व पैलवान मंडळीने सहकार्य केले