जळगाव जा. शहरामध्ये डेंगू रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नगरपरिषद प्रशासनाने धूळ फवारणी करावी-सैय्यद.नफिस..


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

समाजवादी पार्टी जळगाव जामोद शहराच्या वतीने 30 सप्टेंबर रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात जळगाव जामोद शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यू रुग्ण संख्ये मध्ये होत असलेली वाढ चिंतेचा विषय असून करिता नगरपरिषद प्रशासनाने जळगाव जामोद शहरामध्ये धुळ फवारणी करून मच्छरांचा नायनाट करावा. सध्या सर्दी, ताप ,खोकला तसेच मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण जळगाव शहरामध्ये निघत आहेत. हे सर्व आजार मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे होत आहेत करिता समाजवादी पार्टीच्या वतीने नगरपरिषदेला अशी विनंती करण्यात आली आहे की जळगाव जामोद नगर परिषद प्रशासनाने संपूर्ण शहरांमध्ये धूळ फवारणी करावी जेणेकरून डेंग्यू आजाराचे प्रमाण कमी होईल अशा आशयाचे निवेदन समाजवादी पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष सय्यद नफिस यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले. सदर निवेदन देतेवेळी समाजवादी पार्टी शहर अध्यक्ष सैय्यद नफिज़,ऐ आर साबीर, सैय्यद कमर, ज़मीर भाई,करीम भाई,शेख वाहब, यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.

Previous Post Next Post