नांदुरा तालुक्यात ओला दुष्काळग्रस्त घोषित करा मनसे ची जिल्हाधिकारी यांना आग्रही मागणी...


बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.

गेल्या तीन-चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र सह  नांदुरा तालुक्यात सुद्धा पावसाने कहर केला आहे.हातातोंडाशी आलेले पीक तर गेलेच आहे परंतु घरादाराची नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले आहे ही वेळ आणीबाणीची आहे.अशा वेळेस पंचनाम्याची सोपस्कर होत राहतील परंतु आधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला शेतकऱ्याला 50 हजार रुपयाची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तात्काळ द्यावी अधिक करून हा संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीने शेतकरी फार कोलमडला आहे अशा वेळी निवड आश्वासन आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृती ची गरज आहे प्रशासकीय पातळीवर पंचनामे होत राहतील त्यात शेतीचे नुकसान बरोबर घरांच्या व पाळीव प्राण्यांच्या गुरांच्या नुकसानीचा ही विचार होईल आणि रिसर मदत केली जाईल परंतु आम्ही ज्या काही अंशी बोललो त्यानुसार तोपर्यंत वाट पाहणे एवढी ताकद आता शेतकरी बांधवांकडे राहिली नाही याचा विचार करावा आणि सत्तूर पावले पुढे टाकावे तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा कारण नांदुरा तालुक्यामध्ये दहा हजार 669 हेक्टरवर  पावसाचा तडाखा बसलेला आहे मध्ये उडीद मूग सोयाबीन कापूस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदुरा तालुक्यात तर्फे आग्रही मागणी आहे की लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारचे आज जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे तहसीलदार नांदुरा यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष भागवत उगले उपतालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर . राजेश काळे . मनसे नेते अजय  बेलोकार यांसह नांदुरा शहराध्यक्ष सागर जगदाळे उपाध्यक्ष निकेतन वाघमारे शहर संघटक विशाल बग्गन .  महिला सेनेच्या लालिताताई राजेश  निखाडे .   शारदा ताई  राजाराम बोदडे  प्रसिद्धीप्रमुख योगेश सपकाळ प्रवीण माळी  दत्ता येनकर धनंजय देशमुख मोहन इंगळे सह मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post