आँल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन म्हणजेच एमरा संघटनेचा सातवा वर्धापन दिन मनाला अविस्मरणिय वाटत असून या निमित्ताने करण्यात आलेले रक्तदान हे कोरोना काळात जीवनदानासारखेच आहे,असे प्रतिपादन नवनियुक्त शहर ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी केले.शनिवार,ता.११ सप्टेंबरला स्थानिक सिंधी वसाहतीतील शक्तीधाम मंदिरात एमरातर्फे आयोजित रक्त,अन्न व वस्त्रदान शिबीराचे उदघाटन शहर ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या हस्ते झाले.त्याप्रसंगी उदघाटक म्हणून बोलतांना अहिरे यांनी कोरोना काळातील रक्तदानाचे महत्व विशद केले.या उदघाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागिय अधिकारी श्रीकांत देशपांडे उपस्थित होते.तर व्यासपिठावर प्रतिष्ठित व्यापारी ज्येष्ठ इंद्रलाल जेस्वाणी,नेभनदास मोटवाणी,रामचंद्र पारवाणी आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमराचे राज्य उपाध्यक्ष संजय विरवाणी यांनी केले.विरवाणी यांनी एमरा संघटनेच्या देशव्यापी कार्याची माहिती देतांना संघटना सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असल्याचे सांगितले.एमराचे संस्थापक अध्यक्ष कैलास लखयानी,राष्ट्रीय अध्यक्ष अरविंदर खुराना,वरिष्ठ उपाध्यक्ष विभूति प्रसाद,राष्ट्रीय संयुक्त सचिव नवानित पाठक यांच्या आदेशवजा मार्गदर्शनाखाली हा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी बोलतांना स्थानिक व्यापारी मंडळींनी दरोड्याचा उलगडा लवकर करुन नागरिकांना दिलेल्या दिलास्यासाठी ठाणेदार प्रकाश अहिरेंचे आभार मानले.अध्यक्षिय भाषणातून उपविभागिय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सामाजिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी एमराने आजच्यासारखेच समाजपयोगी उपक्रम नेहमी राबवावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.उदघाटनपर कार्यक्रमानंतर २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदात्यांसाठी संघटनेतर्फे चहा,अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.रक्तदान शिबीराला वैद्यकिय अधिकारी व डाँक्टरांनी सहकार्य केले.रक्तदानाच्या उपक्रमाला दुपारी चार वाजेपर्यंत प्रतिसाद लाभला. त्यादरम्यान एमरातर्फे शहरात सुमारे २५० गरजूंना अन्न व वस्त्रदान करण्यात आले.
अंबिका नगरात वृक्षारोपण...
जगात एकीकडे नाईन एलेव्हनचा स्मृतिदिवस साजरा होत असतांना दुसरीकडे ११ सप्टेंबरला अकोटला एमरातर्फे अंबिका नगर भागात वृक्षारोपण करण्यात येऊन हरित संदेश देण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
अकोल्यातील मोबाईल वितरकांचा सत्कार..
अकोटच्या कार्यक्रमात अकोल्यातील मोबाईल वितरक प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.त्यांचा सत्कार राज्य उपाध्यक्ष संजय विरवाणी व स्थानिक पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आला.त्या प्रसंगी त्यांना श्री गणपतिची प्रतिमा भेटवस्तू म्हणून देण्यात आली.
सजविलेल्या दुकानांमध्ये केकची मिठास....
एमराचा सातवा वर्धापन दिन अकोटच्या मोबाईल व्यवसायिकांनी केक कापून एकमेकांना गोड घास भरवत साजरा केला.या दिनानिमित्य मोबाईल व्यवसायिकांनी त्यांच्या दुकानांना सजविले होते.या सजविलेल्या दुकानात केकची मिठास त्याप्रसंगी मोबाईल खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनाही चाखायला मिळाली.
२५ हजार व्यवसायिकांना मार्गदर्शन...
सातव्या वर्धापन दिनानिमित्त एमरातर्फे देशातील २५ हजार मोबाईल व्यवसाय करणाऱ्या बांधवांना राष्ट्रीय मार्गदर्शकांनी एकाच वेळी आभासी मार्गदर्शन केले.मार्गदर्शकांनी संघटनेपूढील आव्हानं,व्यवसाय वाढ,लक्ष्य,शासनाकडून अपेक्षा आदींबाबत सखोल व सविस्तर मार्गदर्शन केले.वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साहित्यिक प्रकाश गायकी यांनी केले.तर आभार प्रदर्शन संजय विरवाणी यांनी केले. प्रमुख कार्यक्रम व विविध उपक्रमांदरम्यान कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.या प्रसंगी एमराचे स्थानिक पदाधिकारी व सदस्य,मोबाईल व्यवसायिक,व्यापारी बांधव व नागरिक आदी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
फोटोओळी...
१)एमरा तर्फे आयोजित रक्तदान शिबीराला मार्गदर्शन करतांना ठाणेदार प्रकाश अहिरे व उपस्थित मान्यवर...
२)एमराच्या रक्तदान शिबीरात रक्तदान करतांना रक्तदाते...
३)एमरातर्फे गरजूंना अन्न व वस्त्रदान करण्यात आले...
४)एमरातर्फे सजविलेल्या मोबाईलच्या दुकानात केक कापून असा सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला...