मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुद्धविहारास ५००० रुपये दिले दान..


 जळगांव जामोद प्रतिनिधी:- 

जळगांव जामोद शहरातील एकता नगरवासी वंचित बहुजन महिला आघाडी च्या तालुका अध्यक्षा सौ सुनिता सुरेश हेलोडे यांनी त्यांची उच्च शिक्षीत कन्या कु शितल  हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जळगांव जामोद तालुक्यातील अकोला खुर्द येथील नव्यानेच लोकवर्गणीतून बुद्धविहाराचे काम सुरू आहे त्या विहाराच्या कामासाठी आपलाही हातभार लागावा या उद्देशाने  बुद्धविहार समीतीला ५००० हजार रुपये नगदि स्वरुपात दान दिले व  कार्यकर्ते व आप्तेष्टांना ससन्हेह भोजनदान सुद्धा दिले तसेच याच कार्यक्रमात पार्वतीबाई इंगळे यांनी इलोरा येथिल सौ गायकवाड या ताईला बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ दान दिला कार्यक्रमाला प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव इंगळे,महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा पार्वताबाई इंगळे, जिल्हा सदस्या मंगलाताई पारवे,तालुका उपाध्यक्ष सुनीलभाऊ बोदडे, तालुका उपाध्यक्ष देवानंद दामोदर, तालुका महासचिव विजय सातव सर, सरपंच रमेशभाऊ नाईक, महिला शहर अध्यक्षा सोनमताई वानखडे,सुष्माताई पारवे, भिमराव हेलोडे ,कु पुणम गवई,शहर उपाध्यक्ष अमोल तायडे, आनंद गवई,, कैलास भगत,यासह बरेच कार्यकर्ते हजर होते

Previous Post Next Post