मामा घरी आलेल्या भाचीचा विजेच्या धक्याने मृत्यू...काकडा गावातील घटना..


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

पथ्रोट पोलीस स्टेशन  अंतर्गत येणाऱ्या ग्राम काकडा येथे आज सकाळच्या सुमारास विजेच्या धक्याने मामाघरी आलेल्या बारा वर्षीय भाचीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्राप्त माहीतीनुसार सुजीता साहेबराव गायगोले वय 12 रा. धनेगाव हि काकडा येथे मामा धम्मपाल वानखडेकडे आली होती. सकाळी अंघोळीकरीता पाणी तापविण्याच्या हिटर काॅईलचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती पथ्रोट पोलीस स्टेशन ल देण्यात आली.  ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण बरडे, अशोक पळसपगार, हेमंत येरखडे, कहाणे, पोलीस पाटील महादेव खडसे यानी  घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणी करिता अचलपुर उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. सदर मृत मुलीस १ बहीण व भाऊ असुन कुटुंब अत्यंत गरीब परिस्थितीत मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करीत आहेत या घटनेमुळे धनेगाव गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. वृत्त लिहेस्तोवर शवविच्छेदन झाले नव्हते.

Previous Post Next Post