मेळघाट मधील धारणी शहरातील योगेश खाडे या शिक्षकानी आपला अनोखा छंद जोपासत आपली नवीन ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या दुचाकीवर विविध अश्या अकरा प्रकारच्या म्हणी लिहून समाज प्रबोधन करण्याचे कार्य हाती घेतले आहे त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.श्री योगेश खाडे हे धारणीतील रहिवासी असून तें सुसर्दा येथील माध्यमिक शाळेवर शिक्षक आहेत. लहानपणापासून निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांना निसर्गाची आवड असल्याने जल, जंगल, जमीन सोबतच वन्यजीव वाचले पाहिजे यासाठी तें सतत प्रयत्नशील असतात. गावोगावी जाऊन त्यांनी बरेचदा या विषयावर समजप्रबोधन केले.त्यांची YAMAHA कंपनीची MH27 बाप 3310 या क्रमांकच्या दुचाकीवर त्यांनी सेव द गर्ल, सेव द टायगर, सेव द जंगल, पढेंगा भारत बढेंगा भारत,जल हैं तो कल हैं,स्कुल चले हम,झाडें लावा झाडें जगवा,सब पढे सब बढे, पेड पौधे मत करो नष्ट सास लेने में होगा कष्ट,पाणी अडवा पाणी जिरवा,अश्या प्रकारच्या म्हणीद्वारे जनजागृती करण्याचे कार्य तें गेल्या वीस वर्षांपासून करत आहेत.
धारणीतील योगेश खाडे या शिक्षकांचा अनोखा छंद..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
