राजु भास्करे /अकोला जिल्हा प्रतिनिधी.
अकोट तालुक्यातील बोर्डी परीसरात गोंधन चोरटे पूर्णपणे सक्रीय झाले असुन त्यांचा परीणाम शेतकर्यांच्या अर्थकारणावर असतांना दिसत आहे.बोर्डी गावालगत असलेल्या रामापुर फाट्यावर शेतकरी रामदास किसन धर्मे यांचे स्वतःचे शेत आहे.तेथे त्यांचे टीनाचे सेटमध्ये गोठ्याचे बांधकाम आहे.तेथे त्यांचे गुरेढोरे बांधलेले असतात.त्यांच्या याच शेतातुन रात्रीला लालसर धामणा रंगाचा बैल चोरट्यांनी चोरुन नेला आहे.अगोदरच शेती तोट्यात असतांना गोंधन चोरी जात असल्याने शेतकरी आर्थीक संकटात सापडत आहे.अंदाचे 30 ते 35 हजार रुपये कीमतीचा बैल चोरीला गेल्याने शेतकरी रामदास किसन धर्मे यांचे मोठे नुकसान झाले आहे.या बाबत ग्रामीण पोलीस स्टेशन अकोट येथे लेखी तक्रार सुद्धा दिली आहे.या आधी सुद्धा बोर्डी,रामापूर मधील बऱ्याच शेतकऱ्यांचे गायी,बैल,गोरे चोरीला गेलेले आहेत बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला लेखी तक्रार सुद्धा दिलेल्या आहेत.पण अजुन पर्यंत गोंधन चोरांना पकडून कोणताही सुगावा लागलेला नाही.संशयीतांनी बैल रात्री 12 वाजताच्या सुमारास बैल रोडने हाकलत नेल्याचा अंदाज आहे.गोंधन चोरीचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले असतांना शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.आधीच नैसर्गिक आपत्ती,उत्पादनात घट ईत्यादी कारणामुळे शेतकरी आर्थिक संकटात असतांना आता या गोंधन चोरीमुळे शेतकरी आणखीच हवालदील झाला आहे.गोंधन चोरुन जात असल्याने गोंधनची अवैद्ध कत्तल होत असल्याची जोरदार चर्चा शेतकऱ्यांन मध्ये आहे.तरी लवकरच गोंधन चोरटे पकडुन अवैद्ध कत्तलीला आळा घालावा अशी मागणी बोर्डी,रामापूर येथील शेतकरी करत आहेत.तरी आता ग्रामीण पोलिस स्टेशनला नव्याने रुजू झालेले ठाणेदार नितीन देशमुख साहेब हे या गोंधन चोरट्यांनां पकडून कसा लगाम लावतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया :---
माझा 30 ते 35 हजार रुपये किमतीचा बैल माझ्या गोठ्यातुन रात्रीला चोरट्यांनी चोरून नेला या बाबत मी ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.तरी पोलिसांनी चोरट्यांला लवकरात लवकर पकडून कायमचा बंदोबस्त लावावा.अशी मागणी येथील शेतकरी
रामदास किसन धर्मे यांनी केली आहे.
