राजु भास्करे / अकोला जिल्हा प्रतिनिधी
आकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गाव खिरकुंड येथिल एका ३५ वर्षिय युवकाचा दुपारच्या सुमारास शाॅक लागून मृत्यू झाला. अनिल पतिराम गवते असे मृत्युकाचे नाव आहे. २५ सप्टेंबर शनिवार दिवसी दुपारच्या सुमारास अनिल गवते हा त्यांचा शेतात काम करीत असताना अचानक शाॅक लागला असून जागीच मृत्यू झाला. अनिल गवते याला कान्तु गवते ४ वर्षे कु. भुरी गवते ६ वर्षे अशी दोन मुले असुन वडीलोपाजिँत १ हेक्टर शेती आहे. ही घटना खिरकुंड परिसरात झाली असता येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेची पुढील तपास आकोट ग्रामिण पोलीस करीत आहेत.
