"कोरोणा विषयक निर्बंधांच पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा"-जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया...


 जळगाव(जामोद)प्रतिनिधी:–

कोरोनामुळे सध्याची परिस्थिती ही भयंकरच आहे. तिसऱ्या लाटेची सुद्धा भीती डोळ्यासमोर उभी आहे. गेल्या दीड वर्षात कित्येक जण आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावून बसले आहेत.पैसे असूनही,हॉस्पिटल मध्ये बेड, ऑक्सिजन आशा आरोग्यविषयक सुविधा मिळेनासे झाल्या होत्या. याचा अनुभव सर्वांना आहे. त्यामुळे येणारा गणेश उत्सव हा कोरोना विषयक प्रशासनाच्या सर्व निर्बंधांचे पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा असे ,आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी केले. दिनांक ३ सप्टेंबर रोजी स्थानिक न.प.सांस्कृतिक भवन मध्ये आयोजित शांतता समितीच्या बैठकीमध्ये बोलत होते. आज जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ७३ आहे. दिवसागणिक ही संख्या वाढतच आहे, केरळ मध्ये रुग्ण संख्या भयंकर वाढली असून तीच परिस्थिती महाराष्ट्रात येऊ नये, यासाठी येणाऱ्या गणेशोत्सवा मध्ये सर्वांनी खबरदारी घ्यावी, असेही यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया म्हणाले. ह्या गणेशोत्सवामध्ये कोरोनाची  कुणाला बाधा होऊ नये, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी, तसेच सामाजिक एकता, सामाजिक सलोखा निर्माण करणारे आणि कोरणा विषयक जनजागृती करणारे देखावे गणेश उत्सव मंडळाने सादर करावे असे आवाहन यावेळी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी केले. गणेश मंडळांनी सामाजिक जनजागृतीवर भर द्यावा तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही अशा कोणत्याही धार्मिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नये, याची सुद्धा जनतेने खबरदारी घेण्याचे आव्हान सुद्धा उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी यावेळी केले.कोरोना विषयक परिस्थिती लक्षात घेता,पोळा, आणि इतर धार्मिक उत्सव सामाजिक सलोखा राखून साजरे करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे जेष्ठ पत्रकार प्रा.नानासाहेब कांडलकर आणि गफ्फार मौलाना यांनी केले.यावेळी ठाणेदार सुनिल अंबुलकर  यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये केले. संपूर्ण जळगाव वाशी यांनी गणेशोत्सव मंडळांमध्ये शासकीय नियमांचे पालन करून शांतताप्रिय मार्गाने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहनत्यांनी  केले.या  बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत,  तहसीलदार शितल सोलाट यांचे सह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि पत्रकार व नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी केले.

Previous Post Next Post