दारूबंदीच्या काडेकोड अंमलबजावणीबाबत तहसीलदार जळगाव जामोद यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन...


 जळगाव जामोद प्रतिनिधी:-

 दिनांक-3 नोव्हेबर 2021 रोजी दारू मुक्ती आंदोलन महाराष्ट्र राज्य यांचेमार्फत प्रमुख संयोजक भाई रजनीकांत यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात व विभागीय संघटक दारू मुक्ती आंदोलन संजय पारवे यांचे नेतृत्वात स्थानिक जळगाव जामोद तहसीलदार यांचे मार्फत खालील प्रमाणे विविध मागण्यांना घेऊन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्यांचा समावेश आहे बुलढाणा जिल्हा संपूर्ण दारू मुक्त करा आणि संत नगरी शेगाव सह जिजाऊ मातृतिर्थ बुलढाणा जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्यात दारूबंदी कायदा लागू करा. जिल्ह्यात अवैध धंद्यांवर देखरेख करण्यास ग्रामसुरक्षा दल गावोगाव कायदा 2017 प्रमाणे गठित करा व त्या दल सदस्यांना तहसिलदारामार्फत ओळखपत्र द्यावे,. 2011 चे शासन निर्णयाप्रमाणे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली असलेल्या व्यसनमुक्ती कृती समितीचे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तातडीने गठन करा, ह्या कारवाया तातडीने करून व्यसनमुक्तीचे धोरण राबवावे. माणसांनाआजारी पाडून मरणास कारणीभूत ठरणारी दारू यांचे कारखाने बंद करा. दारू मुक्ती केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोफत उपचाराचे दहा व्यसनमुक्ती केंद्र काढावे. असे करणे देशाच्या राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी गरजेचे आहे या दारूमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीत युवराज देशमुख, मंगेश कातोरे ,रामदास वानखडे विजय पवार ,संतोष शामराव वानखेडे, विजय वानखडे, विद्यपाल गवई, यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते..

Previous Post Next Post