राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
मेळघाटचीं राजधानी असलेल्या धारणी शहरात भव्य उपजिल्हा रुग्णालय असून तेथे रक्तपेढी नसल्याने मेळघाट मधील गरजू व प्रसूतीमातांना रक्ताची आवश्यकता पडत असल्याने वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्वरित रक्त पेढीचीं व्यवस्था करण्यात यावी,याबाबतचे निवेदन मेळघाट चे माजी आमदार व राष्ट्रवादी कांग्रेस चे नेते केवलरामजी काळे यांनी उवमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून केली.उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे भव्य इमारत असून बहुतेक सुविधाही उपलब्ध झाल्या आहेत.परंतु अत्यावश्यक रक्तपेढी सारखी सुविधा नसल्याने व अचलपूर अमरावती,जाईपर्यंत बऱ्याच रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो.तेथे रोज शेकडो रुग्णाची आवक असून त्याच्यावर उपचार केले जातें.जर रक्तपेढी चीं सुविधा धारणी उपजिल्हा रुग्णालयात झाल्यास मेळघात वासियांना त्याचा बराच फायदा होऊ शकतो.